मुंबई विद्यापीठात दुहेरी पदवी, सह पदवी आणि ट्विनिंग पदवी शिक्षणासाठी विद्या परिषदेनं मंजुरी दिली आहे. यानुसार विद्यार्थ्यांना दोन महाविद्यालयं किंवा उच्च शिक्षण संस्थांमध्ये एकत्र प्रवेश घेता येणार आहे. यामुळे शिक्षण प्रणालीमध्ये मोठा बदल होणार असून सर्वोत्कृष्ट शैक्षणिक पद्धतीच्या सामायीकीकरणाला प्रोत्साहन मिळेस, असं मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू रवींद्र कुलकर्णी यांनी सांगितलं. त्याचप्रमाणे विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार विद्यापीठात प्रोफेसर ऑफ प्रॅक्टिसच्या पदांच्या नियुक्तीलाही विद्या परिषदेनं मान्यता दिली आहे.