राज्यात विधानसभा निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या देदीप्यमान विजयाच्या पार्श्वभूमीवर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी , केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी सदिच्छा भेट घेतली. राज्य सरकारला अनेक योजनांमध्ये केंद्राचं सहकार्य लाभलं म्हणून अडीच वर्षात खूप मोठं काम करू करता आलं आणि याची पोचपावती जनतेनं निकालाच्या माध्यमातून दिली, असं शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं. महाराष्ट्राच्या विकासात केंद्र सरकारचं यापुढेही कायम पाठबळ राहील आणि सहकार्यच मिळेल असं पंतप्रधान मोदी यांनी सांगितल्याचं शिंदे यांनी सांगितलं. नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय लोकशाही