प्रार्थनास्थळं विशेष तरतूद कायदा १९९१ प्रकरणी एमआयएम पक्षाचे प्रमुख असाउद्दीन ओवेसी यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. ओवेसी यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालय आज सुनावणी करणार आहे. या कायद्याची कठोर अंमलबजावणी करण्याची मागणी ओवेसी यांनी या याचिकेत केली आहे. आणि कायदा कठोर पद्धतीनं लागू करण्यासाठी  केंद्र सरकारला न्यायालयानं निर्देश द्यावेत अशी मागणीही या याचिकेत करण्यात आली आहे.