नागपुरात राजभवनात पार पडला शपथविधी; हिवाळी अधिवेशनाला होणार सुरुवात
राज्य मंत्रिमंडळाचा नुकताच विस्तार झाला असून, राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी नागपुरातल्या राजभवनात झालेल्या कार्यक्रमात, ३९ मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. आज ३३ कॅबिनेट आणि सहा राज्यमंत्र्यांनी शपथ घेतली असून, यामध्ये चार महिलांचा समावेश आहे. भाजपाच्या १९, शिवसेनेच्या ११ आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या ९ जणांचा मंत्रिमंडळात आज समावेश करण्यात आला आहे. माधुरी मिसाळ,आशिष जयस्वाल, पंकज भोयर, मेघना बोर्डीकर, इंद्रनील नाईक आणि योगेश कदम या सहा जणांनी राज्यमंत्री पदाची शपथ घेतली.

1 comment on “राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार, ३३ जणांनी कॅबिनेट मंत्रिपदाची तर ६ जणांनी घेतली राज्यमंत्रीपदाची शपथ