महाराष्ट्राची कुलस्वामिनी, देवीच्या महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी आद्यपूर्ण पीठ असलेल्या तुळजापूर इथल्या श्री तुळजाभवानी मातेच्या शाकंभरी नवरात्र महोत्सवाला आज घटस्थापनेने सुरुवात झाली.संबळाच्या कडकडाटात , तुतारीच्या निनादात आणि आई राजा उदो उदो च्या गजरात श्री तुळजाभवानी मंदिरात आज दुपारी बारा वाजता विधिवत घटस्थापना झाली.
तत्पूर्वी आज पहाटे देवीची सिंहासनावर प्रतिष्ठापना झाल्या नंतर दुपारी 12 वाजता घटस्थापना करण्यात आली.
छोटा दसरा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शाकंभरी नवरात्र महोत्सवास सुरुवात झाली असून आजपासून 14 जानेवारी पर्यंत नित्यानेमनाने धार्मिक कार्यक्रम सुरू असणार आहेत. आजपासून दररोज रात्री देवीजींचा विविध वाहनांवर छबिना काढला जातो. उद्या दिनांक 08 जानेवारी पासून अलंकार पूजा केल्या जाणार आहेत.