• January 9, 2025
  • Vivek
  • 0

क्रीडा क्षेत्रातले सर्वात प्रतिष्ठित मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारांची आज घोषणा करण्यात आली. बुध्दिबळ विश्वविजेता डी. गुकेश , पॅरिस ऑलिम्पिकमध्ये नेमबाजीत दोन पदकं जिंकणारी मनु भाकर,  भारतीय पुरुष हॉकी संघाचा कर्णधार हरमनप्रित सिंग आणि पॅरालिम्पिक सुवर्णपदक विजेता  ॲथलिट प्रवीणकुमार यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.

   हा पुरस्कार मिळवणारा डी  गुकेश सर्वात युवा खेळाडू ठरला आहे.

    ३२ खेळाडूंची अर्जुन पुरस्कारांसाठी निवड झाली आहे. यात महाराष्ट्राच्या सचिन खिलारी आणि स्वप्नील कुसळे यांचा समावेश आहे.तर ॲथलिट सुचा सिंग आणि मुलीकांत पेटकर यांची अर्जुन जीवनगौरव पुरस्कारांसाठी निवड करण्यात आली आहे.

   प्रशिक्षकांना दिल्या जाणाऱ्या द्रौणाचार्य पुरस्कारासाठी पॅरा नेमबाज प्रशिक्षक सुभाष राणा, नेमबाज प्रशिक्षक दिपाली देशपांडे आणि हॉकी प्रशिक्षक संदीप संगवान यांची निवड झाली आहे. राष्ट्रीय खेल प्रोत्साहन पुरस्कार भारतीय शारीरिक शिक्षणसंस्थेला जाहीर झाला आहे.

      येत्या १७ जानेवारीला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात येतील.