सरलेलं २०२४ हे वर्ष सर्वांत उष्ण वर्ष ठरलं आहे. भारतीय हवामान खात्यानं दिलेल्या माहितीनुसार २०२४ हे वर्ष १९०१ नंतर सर्वात उष्ण वर्ष ठरलं . सलग १३ महिने सरासरीपेक्षा अधेक तापमानाची नोंद झाली आहे. पूर्व, वायव्य आणि पश्चिम-मध्य प्रदेशातील काही भाग वगळता जानेवारीमध्ये देशातील बहुतांश भागात किमान तापमान सामान्यपेक्षा जास्त राहण्याची अपेक्षा असं भारतीय हवामान विभागाचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांनी सांगितलं आहे. देशाच्या बहुतांश भागात कमाल तापमान सामान्यपेक्षा जास्त राहण्याची अपेक्षा आहे. मध्य भारताच्या पश्चिम आणि उत्तर भागात जानेवारीमध्ये नेहमीपेक्षा अधिक थंडीची लाट येण्याची अपेक्षा असल्याचंही त्यांनी सांगितलं.