बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणाचा खटला बीड मधून हलवून अन्य ठिकाणी चालवावा अशी मागणी विधानपरिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली आहे.आज मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते . याप्रकरणी स्थापन केलेल्या एसआयटीमध्ये अधिकारी बीडचे आहेत त्यामुळे तपासावर प्रभाव पडू शकतो त्यामुळे राज्याचा वरिष्ठ अधिकारी यात असावा आणि या तपासासाठी   राज्याची स्वतंत्र टीम असायला हवी असं दानवे म्हणाले. जे पोलीस तपस करायला टाळाटाळ करत आहेत त्यांच्याकडे तपास का दिला तसंच तिथल्या सरकारी वकिलांनी  वाल्मिक कराड विरोधातला खटला चालवण्यास आयत्यावेळी नकार का दिला असे प्रश्न अंबादास दानवे यांनी उपस्थित केले. एसटी महामंडळ सरकारला अंधारात ठेवून तेराशे एसटी  बसेसचा  करार करत असून यात २ हजार ८०० कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोपही त्यांनी केला.