शेती हा देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे तर शेतकरी हा आत्मा आहे , पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद निर्माण करण्यासाठी केंद्र सरकार सातत्यानं प्रयत्न करत आहे, असं प्रतिपादन केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी केलं,  अहिल्यानगर जिल्हयात  बाभळेश्वर इथल्या कृषि विज्ञान केंद्र इथं आयोजित शेतकरी संवाद कार्यक्रमात ते बोलत होते.  यावेळी राज्याचे जल संपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील उपस्थित होते. शेतकरी आणि महिला शेतकऱ्यांनी पारंपरिक शेती ऐवजी शेतीत नवनवीन प्रयोग करावेत, तसंच शेतीपूरक अशा व्यवसायावरही भर द्यावा असं मत चौहान यांनी यावेळी व्यक्त केलं. यावेळी लखपती दीदी संदर्भात बोलताना सरकारच्या तीन कोटी लखपती दीदीच्या लक्ष्यापैकी १ कोटी १५ लाख महिला लखपती दीदी झाल्या असून उर्वरित लक्ष्य लवकरचं पूर्ण  केलं जाईल असंही त्यांनी म्हटलं. यावेळी   शेती, पूरक व्यवसाय आणि बचत गटांच्या माध्यमातून भरीव कामगिरी केलेल्या  लखपती  दीदींचा तसंच उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शेतकऱ्यांचा शिवराज सिंह चौहान यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. यावेळी कृषीमंत्र्यांनी  महिला बचत गटानं निर्मित केलेल्या विवीध वस्तूंच्या प्रदर्शनाचं उदघाटन करत प्रदर्शनाला भेट दिली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *