पंजाबी कलाकार दिलजीत दोसांझ यांनी नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. दोसांझ हे बहुआयामी प्रतिभा आणि त्या प्रतिभेची सांगड परंपरेशी घालणारे कलाकार आहेत, अशा शब्दांत पंतप्रधानांनी त्यांचे कौतुक केले.
दिलजीत दोसांझ यांनी एक्स समाज माध्यमावर लिहिलेल्या पोस्टला उत्तर देताना पंतप्रधान म्हणाले,”दिलजीत दोसांझसोबत छान संवाद झाला. ते खरोखरच बहुआयामी, प्रतिभा आणि परंपरा यांचा मिलाफ साधणारे कलाकार आहेत. आम्ही संगीत, संस्कृती आणि इतर अनेक विषयांवर जोडले गेलो