इंदौर, मध्‍यप्रदेश येथील साईभक्‍त जुगल किशोर जैसवाल व पुजा जुगल जैसवाल यांनी साईचरणी २०० ग्रॅम सोने आणि ४७ ग्रॅम चांदी इतक्‍या वजनाचा आकर्षक नक्षीकाम केलेला सुवर्ण मुकुट अर्पण केला असल्‍याची माहिती श्री साईबाबा संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब काळेकर यांनी दिली. या मुकुटाची किंमत १४ लाख २० हजार ८०० रुपये असून हा सुंदर नक्षीकाम केलेला सुवर्ण मुकुट साईबाबांच्या चरणी अर्पण करुन श्री साईबाबा संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब काळेकर यांच्‍याकडे सुपुर्द करण्‍यात आला. त्‍यानंतर श्री साईबाबा संस्‍थानच्‍या वतीने मुख्‍य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब काळेकर यांनी देणगीदार साईभक्‍तांचा शाल आणि श्री साईबाबांची मूर्ती देऊन सत्‍कार केला. यावेळी जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *